Check out the new design

Translation of the Meanings of the Noble Quran - Marathi translation - Muhammad Shafi Ansari * - Index of Translations


Translation of the Meanings Surah: Az-Zumar   Verse:
اِنَّاۤ اَنْزَلْنَا عَلَیْكَ الْكِتٰبَ لِلنَّاسِ بِالْحَقِّ ۚ— فَمَنِ اهْتَدٰی فَلِنَفْسِهٖ ۚ— وَمَنْ ضَلَّ فَاِنَّمَا یَضِلُّ عَلَیْهَا ۚ— وَمَاۤ اَنْتَ عَلَیْهِمْ بِوَكِیْلٍ ۟۠
४१. निःसंशय, आम्ही तुमच्यावर सत्यासह हा ग्रंथ लोकांसाठी अवतरित केला आहे, तेव्हा जो मनुष्य सरळ मार्गावर येईल तर ते त्याच्या स्वतःच्या (फायद्या) करिता आहे आणि जो मार्गभ्रष्ट होईल तर त्याच्या मार्गभ्रष्टतेचे ओझे त्याच्याच (शिरा) वर आहे. तुम्ही त्यांच्याबाबत जबाबदार नाही.
Arabic Tafsirs:
اَللّٰهُ یَتَوَفَّی الْاَنْفُسَ حِیْنَ مَوْتِهَا وَالَّتِیْ لَمْ تَمُتْ فِیْ مَنَامِهَا ۚ— فَیُمْسِكُ الَّتِیْ قَضٰی عَلَیْهَا الْمَوْتَ وَیُرْسِلُ الْاُخْرٰۤی اِلٰۤی اَجَلٍ مُّسَمًّی ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیٰتٍ لِّقَوْمٍ یَّتَفَكَّرُوْنَ ۟
४२. अल्लाहच जीवांना (आत्म्यांना) त्यांच्या मृत्युसमयी आणि ज्यांचा मृत्यु आला नाही त्यांना त्यांच्या निद्रावस्थेत काबीज करून घेतो, मग ज्यांच्या मृत्युचा आदेश दिला गेला आहे, त्यांना तो रोखून घेतो आणि इतर (आत्म्यांना) एका निर्धारित वेळेपर्यर्ंत सोडून देतो. विचार चिंतन करणाऱ्यांसाठी यात निश्चितपणे अनेक निशाण्या आहेत.
Arabic Tafsirs:
اَمِ اتَّخَذُوْا مِنْ دُوْنِ اللّٰهِ شُفَعَآءَ ؕ— قُلْ اَوَلَوْ كَانُوْا لَا یَمْلِكُوْنَ شَیْـًٔا وَّلَا یَعْقِلُوْنَ ۟
४३. काय त्या लोकांनी अल्लाहखेरीज (दुसऱ्यांना) शिफारस करणारे निर्धारित करून ठेवले आहेत? (तुम्ही) सांगा की मग ते काहीच हक्क राखत नसले तरी आणि काही अक्कल राखत नसले तरीही?
Arabic Tafsirs:
قُلْ لِّلّٰهِ الشَّفَاعَةُ جَمِیْعًا ؕ— لَهٗ مُلْكُ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— ثُمَّ اِلَیْهِ تُرْجَعُوْنَ ۟
४४. सांगा की सर्व शिफारसींचा मालक अल्लाहच आहे. सर्व आकाशांचे आणि धरतीचे राज्य त्याच्याचकरिता आहे, मग तुम्ही सर्व त्याच्याचकडे परतविले जाल.
Arabic Tafsirs:
وَاِذَا ذُكِرَ اللّٰهُ وَحْدَهُ اشْمَاَزَّتْ قُلُوْبُ الَّذِیْنَ لَا یُؤْمِنُوْنَ بِالْاٰخِرَةِ ۚ— وَاِذَا ذُكِرَ الَّذِیْنَ مِنْ دُوْنِهٖۤ اِذَا هُمْ یَسْتَبْشِرُوْنَ ۟
४५. आणि जेव्हा एकमेव अल्लाहचे वर्णन केले जाते तेव्हा त्या लोकांची हृदये तिरस्कार करू लागतात, जे आखिरतवर ईमान राखत नाहीत, आणि जेव्हा त्याच्याखेरीज (इतरां) चे वर्णन केले जाते, तेव्हा त्यांची हृदये स्पष्टतः आनंदित होतात.१
(१) होय. जेव्हा असे म्हटले जाते की अमुक अमुक देखील उपास्य आहे, किंवा ते देखील अल्लाहचे नेक सदाचारी दास आहेत. ते सुद्धा काही हक्क राखतात, तेही संकट दूर करणारे आहेत, गरजपूर्ती करणारे आहेत, तेव्हा हे अनेकेश्वरवादी खूश होतात. मार्गभ्रष्ट लोकांची आज हीच अवस्था आहे, जेव्हा त्यांना सांगितले जाते की, केवळ ‘हे अल्लाह, मदद’ असे म्हणा, कारण अल्लाहखेरीज दुसरा कोणी मदत करणारा नाही. तेव्हा क्रोधित होतात. हे बोलणे त्यांना मोठे वाईट वाटते, परंतु जेव्हा ‘या अली मदद’, ‘या रसूल मदद’ म्हटले जाते, त्याचप्रमाणे इतर मरण पावलेल्यांकडून मदत मागितली जाते, त्यांच्या नावाने आर्जव केले जाते, उदा. ‘या शेख अब्दुल कादिर शेअन लिल्लाह’ वगैरे तर मग त्यांची मने आनंदविभोर होतात.
Arabic Tafsirs:
قُلِ اللّٰهُمَّ فَاطِرَ السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ عٰلِمَ الْغَیْبِ وَالشَّهَادَةِ اَنْتَ تَحْكُمُ بَیْنَ عِبَادِكَ فِیْ مَا كَانُوْا فِیْهِ یَخْتَلِفُوْنَ ۟
४६. (तुम्ही) सांगा की हे अल्लाह! आकाशांना आणि धरतीला निर्माण करणाऱ्या, लपलेल्या व उघड गोष्टी जाणणाऱ्या! तूच आपल्या दासांच्या दरम्यान त्या गोष्टींचा फैसला करशील, ज्या गोष्टींमध्ये ते मतभेद करीत होते.
Arabic Tafsirs:
وَلَوْ اَنَّ لِلَّذِیْنَ ظَلَمُوْا مَا فِی الْاَرْضِ جَمِیْعًا وَّمِثْلَهٗ مَعَهٗ لَافْتَدَوْا بِهٖ مِنْ سُوْٓءِ الْعَذَابِ یَوْمَ الْقِیٰمَةِ ؕ— وَبَدَا لَهُمْ مِّنَ اللّٰهِ مَا لَمْ یَكُوْنُوْا یَحْتَسِبُوْنَ ۟
४७. आणि अत्याचारी लोकांजवळ जर ते सर्व काही असावे जे धरतीवर आहे, आणि त्यासोबत आणखी तेवढेच असावे तरी देखील कठोर शिक्षा यातनेच्या मोबदल्यात कयामतच्या दिवशी हे सर्व काही देऊन टाकतील, आणि त्यांच्यासमोर अल्लाहतर्फे असे जाहीर होईल ज्याचे त्यांनी अनुमानही केले नव्हते.
Arabic Tafsirs:
 
Translation of the Meanings Surah: Az-Zumar
Index of Surahs Page Number
 
Translation of the Meanings of the Noble Quran - Marathi translation - Muhammad Shafi Ansari - Index of Translations

Translated by Muhammad Shafi Ansari

Close