Check out the new design

Translation of the Meanings of the Noble Quran - Marathi translation - Muhammad Shafi Ansari * - Index of Translations


Translation of the Meanings Surah: An-Naml   Verse:
وَاِنَّهٗ لَهُدًی وَّرَحْمَةٌ لِّلْمُؤْمِنِیْنَ ۟
७७. आणि हा (कुरआन) ईमान राखणाऱ्यांकरिता निश्चितच मार्गदर्शन आणि दया- कृपा आहे.
Arabic Tafsirs:
اِنَّ رَبَّكَ یَقْضِیْ بَیْنَهُمْ بِحُكْمِهٖ ۚ— وَهُوَ الْعَزِیْزُ الْعَلِیْمُ ۟ۚ
७८. तुमचा पालनकर्ता त्यांच्या दरम्यान आपल्या आदेशाने (सर्व) फैसला करील. तो मोठा वर्चस्वशाली आणि ज्ञान राखणारा आहे.
Arabic Tafsirs:
فَتَوَكَّلْ عَلَی اللّٰهِ ؕ— اِنَّكَ عَلَی الْحَقِّ الْمُبِیْنِ ۟
७९. तेव्हा, तुम्ही अल्लाहवरच भरवसा राखा. निःसंशय, तुम्ही सत्य आणि उघड अशा दीन (धर्मा) वर आहात.
Arabic Tafsirs:
اِنَّكَ لَا تُسْمِعُ الْمَوْتٰی وَلَا تُسْمِعُ الصُّمَّ الدُّعَآءَ اِذَا وَلَّوْا مُدْبِرِیْنَ ۟
८०. निःसंशय, तुम्ही ना मृतांना ऐकवू शकता आणि ना बहिऱ्यांना आपली पुकार (हाक) ऐकवू शकता, जेव्हा ते पाठ फिरवून विमुख होत असतील.
Arabic Tafsirs:
وَمَاۤ اَنْتَ بِهٰدِی الْعُمْیِ عَنْ ضَلٰلَتِهِمْ ؕ— اِنْ تُسْمِعُ اِلَّا مَنْ یُّؤْمِنُ بِاٰیٰتِنَا فَهُمْ مُّسْلِمُوْنَ ۟
८१. आणि ना तुम्ही आंधळ्यांना त्यांच्या मार्गभ्रष्टतेपासून हटवून, सन्मार्गाला लावू शकता, तुम्ही तर केवळ त्यांना ऐकवू शकता, ज्यांनी आमच्या आयतींवर ईमान राखले आहे, मग ते आज्ञाधारक होतात.
Arabic Tafsirs:
وَاِذَا وَقَعَ الْقَوْلُ عَلَیْهِمْ اَخْرَجْنَا لَهُمْ دَآبَّةً مِّنَ الْاَرْضِ تُكَلِّمُهُمْ ۙ— اَنَّ النَّاسَ كَانُوْا بِاٰیٰتِنَا لَا یُوْقِنُوْنَ ۟۠
८२. आणि जेव्हा त्यांच्यावर शिक्षा- यातने (अज़ाब) चा वायदा लागू होईल, आम्ही जमिनीतून त्यांच्यासाठी एक जनावर बाहेर काढू, जे त्यांच्याशी बोलत असेल की लोक आमच्या आयतींवर विश्वास ठेवत नव्हते.१
(१) मूळ शब्दा दाब्बः (विचित्र जनावर) तेच होय, जे कयामत जवळ आल्याच्या निशाण्यांपैकी आहे. हदीसमधील उल्लेखानुसार पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना फर्माविले, ‘‘कयामत त्या वेळेपर्यंत येणार नाही, जोपर्यंत तुम्ही दहा निशाण्या पाहून घेत नाही. त्यापैकी एका जनावराचे जमिनीतून बाहेर पडणे होय.’’ (सहीह मुस्लिम, किताबुल फेतन बाबु फी आयातिल-लती तकूनु कब्ल स्साअह) दुसऱ्या एका कथनानुसार, ‘‘सर्वांत प्रथम जी निशाणी जाहीर होईल, ती म्हणजे सूर्याचे पूर्व दिशेऐवजी पश्चिमेकडून उगवणे आणि दुपार होण्याआधी जनावराचे बाहेर निघणे’’ या दोघांपैकी जी निशाणी जाहीर होईल, दुसरी तिच्यानंतर लगेच जाहीर होईल. (सहीह मुस्लिम)
Arabic Tafsirs:
وَیَوْمَ نَحْشُرُ مِنْ كُلِّ اُمَّةٍ فَوْجًا مِّمَّنْ یُّكَذِّبُ بِاٰیٰتِنَا فَهُمْ یُوْزَعُوْنَ ۟
८३. आणि ज्या दिवशी आम्ही प्रत्येक जनसमूहामधून, अशा लोकांचे समूह, जे आमच्या आयतींना खोटे ठरवित होते, घेरून आणू, मग ते सर्वच्या सर्व वेगळे केले जातील.
Arabic Tafsirs:
حَتّٰۤی اِذَا جَآءُوْ قَالَ اَكَذَّبْتُمْ بِاٰیٰتِیْ وَلَمْ تُحِیْطُوْا بِهَا عِلْمًا اَمَّاذَا كُنْتُمْ تَعْمَلُوْنَ ۟
८४. जेव्हा सर्वच्या सर्व येऊन पोहचतील तेव्हा अल्लाह फर्माविल की तुम्ही माझ्या आयतींना, यानंतरही की तुम्हाला त्यांचे पूर्ण ज्ञान नव्हते, का खोटे ठरविले? आणि हेही सांगा की तुम्ही काय (कर्म) करीत राहिलात?
Arabic Tafsirs:
وَوَقَعَ الْقَوْلُ عَلَیْهِمْ بِمَا ظَلَمُوْا فَهُمْ لَا یَنْطِقُوْنَ ۟
८५. आणि याचे कारण हे की त्यांनी अत्याचार केला होता, त्यामुळे आमचे फर्मान त्याच्यावर लागू होईल आणि ते काहीच बोलू शकणार नाहीत.
Arabic Tafsirs:
اَلَمْ یَرَوْا اَنَّا جَعَلْنَا الَّیْلَ لِیَسْكُنُوْا فِیْهِ وَالنَّهَارَ مُبْصِرًا ؕ— اِنَّ فِیْ ذٰلِكَ لَاٰیٰتٍ لِّقَوْمٍ یُّؤْمِنُوْنَ ۟
८६. काय ते पाहत नाहीत की आम्ही रात्र अशासाठी बनविली आहे की त्यांनी तिच्यात आराम करू शकावे आणि दिवसाला आम्ही दाखविणारा बनविले आहे. निःसंशय यात त्या लोकांकरिता निशाण्या आहेत, जे ईमान राखतात.
Arabic Tafsirs:
وَیَوْمَ یُنْفَخُ فِی الصُّوْرِ فَفَزِعَ مَنْ فِی السَّمٰوٰتِ وَمَنْ فِی الْاَرْضِ اِلَّا مَنْ شَآءَ اللّٰهُ ؕ— وَكُلٌّ اَتَوْهُ دٰخِرِیْنَ ۟
८७. आणि ज्या दिवशी सूर फुंकला जाईल तेव्हा ते सर्वच्या सर्व, जे आकाशांमध्ये आणि जमिनीवर आहेत घाबरून उठतील,१ परंतु ज्याला अल्लाह इच्छिल (सुरक्षित ठेवील) आणि सर्वच्या सर्व विवश, लाचार होऊन त्याच्यासमोर हजर होतील.
(१) ‘सुर’शी अभिप्रेत तो शंख होय, ज्यात इस्राफील (अलै.) अल्लाहच्या आदेशाने फुंक मारतील. ही फुंक दोन किंवा दोनपेक्षा जास्त असेल. पहिल्या फुंकीत सारे जग घाबरून जाऊन बेभान होईल, दुसऱ्या फुंकीत सर्व मरण पावतील आणि तिसऱ्या खेपेस सर्व लोक कबरींमधून जिवंत होऊन उभे राहतील आणि काहींच्या मते चौथी फुंक असेल ज्यात सर्व हश्र (हिशोबा) च्या मैदानात जमा होतील. या ठिकाणी कोणती फुंक अभिप्रेत आहे? इमाम इब्ने कसीर यांच्या मते ही पहिली फुंक आणि इमाम शौकानी यांच्या मते तिसरी फुंक होय, जेव्हा लोक कबरीमधून उठतील.
Arabic Tafsirs:
وَتَرَی الْجِبَالَ تَحْسَبُهَا جَامِدَةً وَّهِیَ تَمُرُّ مَرَّ السَّحَابِ ؕ— صُنْعَ اللّٰهِ الَّذِیْۤ اَتْقَنَ كُلَّ شَیْءٍ ؕ— اِنَّهٗ خَبِیْرٌ بِمَا تَفْعَلُوْنَ ۟
८८. आणि तुम्ही पर्वतांना आपल्या जागी निश्चित व स्थिर समजता, परंतु ते देखील ढगासारखे उडत फिरतील. ही निर्मिती (कार्यकुशलता) आहे अल्लाहची, ज्याने प्रत्येक वस्तू मजबूत बनविली आहे. तुम्ही जे काही करता, अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो.
Arabic Tafsirs:
 
Translation of the Meanings Surah: An-Naml
Index of Surahs Page Number
 
Translation of the Meanings of the Noble Quran - Marathi translation - Muhammad Shafi Ansari - Index of Translations

Translated by Muhammad Shafi Ansari

Close