Check out the new design

Translation of the Meanings of the Noble Quran - Marathi translation - Muhammad Shafi Ansari * - Index of Translations


Translation of the Meanings Surah: Al-Isrā’   Verse:
قُلْ كُوْنُوْا حِجَارَةً اَوْ حَدِیْدًا ۟ۙ
५०. उत्तर द्या की तुम्ही दगड बना किंवा लोखंड.
Arabic Tafsirs:
اَوْ خَلْقًا مِّمَّا یَكْبُرُ فِیْ صُدُوْرِكُمْ ۚ— فَسَیَقُوْلُوْنَ مَنْ یُّعِیْدُنَا ؕ— قُلِ الَّذِیْ فَطَرَكُمْ اَوَّلَ مَرَّةٍ ۚ— فَسَیُنْغِضُوْنَ اِلَیْكَ رُءُوْسَهُمْ وَیَقُوْلُوْنَ مَتٰی هُوَ ؕ— قُلْ عَسٰۤی اَنْ یَّكُوْنَ قَرِیْبًا ۟
५१. किंवा एखादी अशी वस्तू, जी तुमच्या मनात अतिशय महान वाटत असेल. मग त्यांनी विचारावे की असा कोण आहे, जो दुसऱ्यांदा आमचे जीवन परत करेल? तुम्ही उत्तर द्या की तोच (अल्लाह) ज्याने तुम्हाला पहिल्या खेपेस निर्माण केले. यावर ते आपले डोके हलवून तुम्हाला विचारतील की, बरे हे केव्हा घडून येईल? तर तुम्ही उत्तर द्या की नवल नव्हे की ते लवकरच घडून येईल.
Arabic Tafsirs:
یَوْمَ یَدْعُوْكُمْ فَتَسْتَجِیْبُوْنَ بِحَمْدِهٖ وَتَظُنُّوْنَ اِنْ لَّبِثْتُمْ اِلَّا قَلِیْلًا ۟۠
५२. ज्या दिवशी तो तुम्हाला बोलावील, तुम्ही त्याची प्रशंसा करत आज्ञापालन कराल आणि अनुमान लावाल की तुम्ही फार कमी काळ राहिलात.
Arabic Tafsirs:
وَقُلْ لِّعِبَادِیْ یَقُوْلُوا الَّتِیْ هِیَ اَحْسَنُ ؕ— اِنَّ الشَّیْطٰنَ یَنْزَغُ بَیْنَهُمْ ؕ— اِنَّ الشَّیْطٰنَ كَانَ لِلْاِنْسَانِ عَدُوًّا مُّبِیْنًا ۟
५३. आणि माझ्या दासांना सांगा की त्यांनी फार उत्तम गोष्ट आपल्या मुखातून काढत जावी, कारण सैतान आपसात फूट पाडतो. निश्चितच सैतान माणसाचा उघड शत्रू आहे.
Arabic Tafsirs:
رَبُّكُمْ اَعْلَمُ بِكُمْ ؕ— اِنْ یَّشَاْ یَرْحَمْكُمْ اَوْ اِنْ یَّشَاْ یُعَذِّبْكُمْ ؕ— وَمَاۤ اَرْسَلْنٰكَ عَلَیْهِمْ وَكِیْلًا ۟
५४. तुमचा पालनकर्ता तुमची अवस्था तुमच्यापेक्षा अधिक जाणणारा आहे. तो जर इच्छिल तर तुमच्यावर दया करेल, इच्छिल तर तुम्हाला शिक्षा देईल. आम्ही तुम्हाला त्यांच्यावर देखरेख ठेवणारा बनवून पाठविले नाही.
Arabic Tafsirs:
وَرَبُّكَ اَعْلَمُ بِمَنْ فِی السَّمٰوٰتِ وَالْاَرْضِ ؕ— وَلَقَدْ فَضَّلْنَا بَعْضَ النَّبِیّٖنَ عَلٰی بَعْضٍ وَّاٰتَیْنَا دَاوٗدَ زَبُوْرًا ۟
५५. आणि आकाशांमध्ये आणि धरतीत जे काही आहे, ते सर्व तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो, आम्ही काही पैगंबरांना काहींवर श्रेष्ठता प्रदान केली आहे आणि दाऊदला जबूर आम्हीच प्रदान केले.
Arabic Tafsirs:
قُلِ ادْعُوا الَّذِیْنَ زَعَمْتُمْ مِّنْ دُوْنِهٖ فَلَا یَمْلِكُوْنَ كَشْفَ الضُّرِّ عَنْكُمْ وَلَا تَحْوِیْلًا ۟
५६. तुम्ही सांगा, (अल्लाह) शिवाय ज्यांना तुम्ही (उपास्य) समजत आहात, त्यांना दुआ-प्रार्थना करा, परंतु ते ना तुमचे एखादे दुःख दूर करू शकतात आणि ना बदलू शकतात.१
(१) या आयतीत ‘मिन्‌दूनीही’शी अभिप्रेत फरिश्ते आणि बुजूर्गांची चित्रे आणि मूर्त्या होत ज्यांची ते पूजा करीत असत किंवा हजरत उजैर आणि ईसा मसिह होत, ज्यांना यहूदी आणि ख्रिश्चन अल्लाहचा पुत्र म्हणत, त्यांना ईशगुणसंपन्न मानत अथवा ते जिन्न होत, ज्यांनी ईमान राखले होते आणि मूर्तिपूजक त्यांची पूजा करीत. अतः या आयतीत सांगितले जात आहे की ते स्वतःही अल्लाहचे सामिप्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत व त्याच्या दया-कृपेची आस बाळगत व त्याच्या शिक्षेचे भय राखत अर्थात हा गुणधर्म निर्जीव (पाषाणां) मध्ये असू शकत नाही. तेव्हा हे स्पष्ट होते की, ‘अल्लाहशिवाय ज्यांची उपासना केली जात राहिली’ त्या केवळ पाषाणाच्या मूर्त्याच नव्हत्या, तर अल्लाहचे दासही होते, ज्यात काही फरिश्ते, काही औलिया, काही पैगंबर व काही जिन्न होते. अल्लाहने या सर्वांविषयी फर्माविले की ते काहीच करू शकत नाहीत. ते ना एखाद्याचे दुःख दूर करू शकतात, ना कोणाच्या अवस्थेत बदल घडवू शकतात.
Arabic Tafsirs:
اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ یَدْعُوْنَ یَبْتَغُوْنَ اِلٰی رَبِّهِمُ الْوَسِیْلَةَ اَیُّهُمْ اَقْرَبُ وَیَرْجُوْنَ رَحْمَتَهٗ وَیَخَافُوْنَ عَذَابَهٗ ؕ— اِنَّ عَذَابَ رَبِّكَ كَانَ مَحْذُوْرًا ۟
५७. ज्यांना हे लोक दुआ प्रार्थना करतात, ते स्वतः आपल्या पालनकर्त्याची निकटता शोधत असतात की त्यांच्यापैकी कोण अधिक निकट होईल, ते तर स्वतः त्याच्या दया-कृपेची आशा बाळगतात आणि त्याच्या शिक्षा-यातनेपासून भयभीत राहतात. निःसंशय तुमच्या पालनकर्त्याचा अज़ाब (शिक्षा-यातना) भय राखण्याची गोष्ट आहे.
Arabic Tafsirs:
وَاِنْ مِّنْ قَرْیَةٍ اِلَّا نَحْنُ مُهْلِكُوْهَا قَبْلَ یَوْمِ الْقِیٰمَةِ اَوْ مُعَذِّبُوْهَا عَذَابًا شَدِیْدًا ؕ— كَانَ ذٰلِكَ فِی الْكِتٰبِ مَسْطُوْرًا ۟
५८. आणि जेवढ्या देखील वस्त्या आहेत, आम्ही त्यांना कयामतचा दिवस येण्यापूर्वी एकतर उद्‌ध्वस्त करून टाकू किंवा अतिशय सक्त शिक्षा देऊ. हे तर ग्रंथात लिहिले गेले आहे.
Arabic Tafsirs:
 
Translation of the Meanings Surah: Al-Isrā’
Index of Surahs Page Number
 
Translation of the Meanings of the Noble Quran - Marathi translation - Muhammad Shafi Ansari - Index of Translations

Translated by Muhammad Shafi Ansari

Close