Check out the new design

የተከበረው ቁርአን መልዕክተ ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ * - የትርጉሞች ማውጫ


የመልዕክት ትርጉም ሱራ (ምዕራፍ): አል ኢስራዕ   አንቀፅ:
ذٰلِكَ مِمَّاۤ اَوْحٰۤی اِلَیْكَ رَبُّكَ مِنَ الْحِكْمَةِ ؕ— وَلَا تَجْعَلْ مَعَ اللّٰهِ اِلٰهًا اٰخَرَ فَتُلْقٰی فِیْ جَهَنَّمَ مَلُوْمًا مَّدْحُوْرًا ۟
३९. हे देखील त्या वहयी (प्रकाशना) पैकी आहे, जिला तुमच्या पालनकर्त्याने तुमच्याकडे हिकमतीने उतरविले आहे, यास्तव अल्लाहसोबत दुसऱ्या कोणत्याही उपास्य बनवू नका अन्यथा धिःक्कार करून आणि अपमानित करून जहन्नममध्ये टाकले जाल.
ዓረብኛ ተፍሲሮች:
اَفَاَصْفٰىكُمْ رَبُّكُمْ بِالْبَنِیْنَ وَاتَّخَذَ مِنَ الْمَلٰٓىِٕكَةِ اِنَاثًا ؕ— اِنَّكُمْ لَتَقُوْلُوْنَ قَوْلًا عَظِیْمًا ۟۠
४०. काय पुत्रांकरिता अल्लाहने तुम्हाला निवडून घेतले आहे आणि स्वतः आपल्याकरिता फरिश्त्यांना मुली बनवून घेतले? खात्रीने तुम्ही फार मोठे बोल बोलत आहात.
ዓረብኛ ተፍሲሮች:
وَلَقَدْ صَرَّفْنَا فِیْ هٰذَا الْقُرْاٰنِ لِیَذَّكَّرُوْا ؕ— وَمَا یَزِیْدُهُمْ اِلَّا نُفُوْرًا ۟
४१. आणि आम्ही तर या कुरआनात सर्व प्रकारे सांगितले आहे की लोकांच्या ध्यानी यावे, परंतु यावरही त्यांचा तिरस्कारच वाढतो.
ዓረብኛ ተፍሲሮች:
قُلْ لَّوْ كَانَ مَعَهٗۤ اٰلِهَةٌ كَمَا یَقُوْلُوْنَ اِذًا لَّابْتَغَوْا اِلٰی ذِی الْعَرْشِ سَبِیْلًا ۟
४२. तुम्ही सांगा, जर अल्लाहसोबत आणखी दुसरे उपास्य असते, जसे की हे लोक सांगतात, तर अवश्य त्यांनी आतापर्यंत अर्शच्या स्वामीकडे मार्ग शोधला असता.
ዓረብኛ ተፍሲሮች:
سُبْحٰنَهٗ وَتَعٰلٰی عَمَّا یَقُوْلُوْنَ عُلُوًّا كَبِیْرًا ۟
४३. जे काही हे सांगतात, त्याहून तो पवित्र आणि महान, अतिशय दूर, आणि अतिशय उच्चतम आहे.
ዓረብኛ ተፍሲሮች:
تُسَبِّحُ لَهُ السَّمٰوٰتُ السَّبْعُ وَالْاَرْضُ وَمَنْ فِیْهِنَّ ؕ— وَاِنْ مِّنْ شَیْءٍ اِلَّا یُسَبِّحُ بِحَمْدِهٖ وَلٰكِنْ لَّا تَفْقَهُوْنَ تَسْبِیْحَهُمْ ؕ— اِنَّهٗ كَانَ حَلِیْمًا غَفُوْرًا ۟
४४. सप्त आकाश आणि धरती, आणि जे काही त्यांच्यात आहे, सर्व त्याचेच स्तुति-गान करतात. अशी एकही वस्तू नाही, जी पवित्रता आणि महानतेसह त्याचे स्मरण करीत नसेल. मात्र हे खरे आहे की तुम्ही तिचे महिमागान समजू शकत नाही. निःसंशय अल्लाह मोठा सहनशील आणि माफ करणारा आहे.
ዓረብኛ ተፍሲሮች:
وَاِذَا قَرَاْتَ الْقُرْاٰنَ جَعَلْنَا بَیْنَكَ وَبَیْنَ الَّذِیْنَ لَا یُؤْمِنُوْنَ بِالْاٰخِرَةِ حِجَابًا مَّسْتُوْرًا ۟ۙ
४५. आणि जेव्हा तुम्ही कुरआन पठण करता, तेव्हा आम्ही तुमच्या आणि त्या लोकांच्या दरम्यान, जे आखिरतवर विश्वास ठेवत नाही, एक गुप्त पडदा टाकतो.
ዓረብኛ ተፍሲሮች:
وَّجَعَلْنَا عَلٰی قُلُوْبِهِمْ اَكِنَّةً اَنْ یَّفْقَهُوْهُ وَفِیْۤ اٰذَانِهِمْ وَقْرًا ؕ— وَاِذَا ذَكَرْتَ رَبَّكَ فِی الْقُرْاٰنِ وَحْدَهٗ وَلَّوْا عَلٰۤی اَدْبَارِهِمْ نُفُوْرًا ۟
४६. आणि त्यांच्या हृदयांवर पडदे टाकले आहेत की त्यांनी त्याला समजावे आणि त्यांच्या कानात बधीरता आणि जेव्हा तुम्ही केवळ अल्लाहचेच वर्णन त्याच्या एकमेवतेसह या कुरआनात करता तेव्हा ते तोंड फिरवून पळ काढतात.
ዓረብኛ ተፍሲሮች:
نَحْنُ اَعْلَمُ بِمَا یَسْتَمِعُوْنَ بِهٖۤ اِذْ یَسْتَمِعُوْنَ اِلَیْكَ وَاِذْ هُمْ نَجْوٰۤی اِذْ یَقُوْلُ الظّٰلِمُوْنَ اِنْ تَتَّبِعُوْنَ اِلَّا رَجُلًا مَّسْحُوْرًا ۟
४७. ज्या हेतुने ते कुरआन ऐकतात, त्यांचे इरादे आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. जेव्हा हे तुमच्याकडे कान लावून असतात. तेव्हा देखील, आणि जेव्हा हे सल्लामसलत करतात तेव्हाही वास्तविक हे अत्याचारी लोक म्हणतात की तुम्ही अशा व्यक्तीचे अनुसरण करण्यात मग्न आहात, ज्याच्यावर जादूटोणा केला गेला आहे.
ዓረብኛ ተፍሲሮች:
اُنْظُرْ كَیْفَ ضَرَبُوْا لَكَ الْاَمْثَالَ فَضَلُّوْا فَلَا یَسْتَطِیْعُوْنَ سَبِیْلًا ۟
४८. जरा पहा तरी तुमच्या साठी ते कस कशी उदाहरणे देतात यास्तव ते चुकीच्या मार्गाकडे जात आहेत आता तर सरळ मार्ग प्राप्त करणे त्यांना शक्य नाही
ዓረብኛ ተፍሲሮች:
وَقَالُوْۤا ءَاِذَا كُنَّا عِظَامًا وَّرُفَاتًا ءَاِنَّا لَمَبْعُوْثُوْنَ خَلْقًا جَدِیْدًا ۟
४९. ते म्हणाले, काय जेव्हा आम्ही हाडे आणि धूळ माती होऊन जाऊ तर काय आम्ही नव्याने जन्मास येऊन दुसऱ्यांदा उठवून उभे केले जाऊ?
ዓረብኛ ተፍሲሮች:
 
የመልዕክት ትርጉም ሱራ (ምዕራፍ): አል ኢስራዕ
የሱራዎች ማውጫ ገፅ ቁጥር
 
የተከበረው ቁርአን መልዕክተ ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ - የትርጉሞች ማውጫ

በሙሐመድ ሸፊዕ አንሷሪ ተተረጎመ

ለመዝጋት