Check out the new design

የተከበረው ቁርአን መልዕክተ ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ * - የትርጉሞች ማውጫ


የመልዕክት ትርጉም ሱራ (ምዕራፍ): አል ኢስራዕ   አንቀፅ:
مَنْ كَانَ یُرِیْدُ الْعَاجِلَةَ عَجَّلْنَا لَهٗ فِیْهَا مَا نَشَآءُ لِمَنْ نُّرِیْدُ ثُمَّ جَعَلْنَا لَهٗ جَهَنَّمَ ۚ— یَصْلٰىهَا مَذْمُوْمًا مَّدْحُوْرًا ۟
१८. ज्याची इच्छा फक्त या शीघ्रतापूर्ण जगापुरतीच असेल तर त्याला आम्ही इथे, जेवढे देऊ इच्छितो लवकर प्रदान करतो. शेवटी मात्र त्याच्यासाठी आम्ही जहन्नम निश्चित करतो, जिथे तो मोठ्या वाईट अवस्थेत, धिःक्कारला गेलेला दाखल होईल.
ዓረብኛ ተፍሲሮች:
وَمَنْ اَرَادَ الْاٰخِرَةَ وَسَعٰی لَهَا سَعْیَهَا وَهُوَ مُؤْمِنٌ فَاُولٰٓىِٕكَ كَانَ سَعْیُهُمْ مَّشْكُوْرًا ۟
१९. आणि जो आखिरतची इच्छा बाळगेल, आणि त्यासाठी जसा प्रयत्न करायला हवा, तसा तो करतही असेल आणि तो ईमान राखणाराही असेल तर मग हेच ते लोक होत, ज्याच्या प्रयत्नाला अल्लाहच्या ठायी पुरेपूर सन्मान दिला जाईल.
ዓረብኛ ተፍሲሮች:
كُلًّا نُّمِدُّ هٰۤؤُلَآءِ وَهٰۤؤُلَآءِ مِنْ عَطَآءِ رَبِّكَ ؕ— وَمَا كَانَ عَطَآءُ رَبِّكَ مَحْظُوْرًا ۟
२०. प्रत्येकाला आम्ही प्रदान करीत असतो यांनाही आणि त्यांनाही, तुमच्या पालनकर्त्याच्या देणग्यांमधून, आणि तुमच्या पालनकर्त्याचा अनुग्रह थांबलेला नाही.
ዓረብኛ ተፍሲሮች:
اُنْظُرْ كَیْفَ فَضَّلْنَا بَعْضَهُمْ عَلٰی بَعْضٍ ؕ— وَلَلْاٰخِرَةُ اَكْبَرُ دَرَجٰتٍ وَّاَكْبَرُ تَفْضِیْلًا ۟
२१. पाहा, त्यांच्यात एकाला एकावर कशा प्रकारे श्रेष्ठता प्रदान केली आहे आणि आखिरत (मरणोत्तर जीवन) तर दर्जाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे आणि श्रेष्ठतेच्या दृष्टीनेही फारच उत्तम आहे.
ዓረብኛ ተፍሲሮች:
لَا تَجْعَلْ مَعَ اللّٰهِ اِلٰهًا اٰخَرَ فَتَقْعُدَ مَذْمُوْمًا مَّخْذُوْلًا ۟۠
२२. अल्लाहसोबत दुसऱ्या कुणाला उपास्य बनवू नका की शेवटी तुम्ही अपमानित, असहाय्य होऊन बसाल.
ዓረብኛ ተፍሲሮች:
وَقَضٰی رَبُّكَ اَلَّا تَعْبُدُوْۤا اِلَّاۤ اِیَّاهُ وَبِالْوَالِدَیْنِ اِحْسَانًا ؕ— اِمَّا یَبْلُغَنَّ عِنْدَكَ الْكِبَرَ اَحَدُهُمَاۤ اَوْ كِلٰهُمَا فَلَا تَقُلْ لَّهُمَاۤ اُفٍّ وَّلَا تَنْهَرْهُمَا وَقُلْ لَّهُمَا قَوْلًا كَرِیْمًا ۟
२३. आणि तुमच्या पालनकर्त्याने उघड आदेश दिलेला आहे की तुम्ही त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचीही उपासना करू नका आणि माता-पित्याशी सद्‌व्यवहार करा, जर तुमच्या उपस्थितीत (हयातीत) यांच्यापैकी एक किंवा हे दोघे वृद्धावस्थेस पोहोचतील तर त्यांना ‘अरे’ सुद्धा बोलू नका, त्यांना दाटवू नका, उलट त्यांच्याशी आदर-सन्मानाने बोलत जा.
ዓረብኛ ተፍሲሮች:
وَاخْفِضْ لَهُمَا جَنَاحَ الذُّلِّ مِنَ الرَّحْمَةِ وَقُلْ رَّبِّ ارْحَمْهُمَا كَمَا رَبَّیٰنِیْ صَغِیْرًا ۟ؕ
२४. आणि नरमी व प्रेमासह त्यांच्यासमोर विनम्रतापूर्वक हात पसरवून ठेवा१ आणि दुआ-प्रार्थना करीत राहा, हे माझ्या पालनकर्त्या! यांच्यावर अशीच दया कर जशी यांनी माझ्या बालपणात माझे पालनपोषण करण्यात केली आहे.
(१) पक्षिणी जेव्हा आपल्या पिलांना आपल्या प्रेम-छत्रात घेते, तेव्हा त्यांच्यासाठी आपले पंख खाली सोडते, तद्‌वतच तू देखील आपल्या माता-पित्याशी अशाच प्रकारे चांगला व प्रेमपूर्ण व्यवहार कर आणि त्यांचा अशा प्रकारे सांभाळ कर, ज्या प्रकारे त्यांनी बालपणी तुझा सांभाळ केला.
ዓረብኛ ተፍሲሮች:
رَبُّكُمْ اَعْلَمُ بِمَا فِیْ نُفُوْسِكُمْ ؕ— اِنْ تَكُوْنُوْا صٰلِحِیْنَ فَاِنَّهٗ كَانَ لِلْاَوَّابِیْنَ غَفُوْرًا ۟
२५. जे काही तुमच्या हृदयात आहे ते तुमचा पालनकर्ता चांगल्या प्रकारे जाणतो. जर तुम्ही नेक सदाचारी असाल तर तो क्षमा-याचना करणाऱ्यांना माफ करणारा आहे.
ዓረብኛ ተፍሲሮች:
وَاٰتِ ذَا الْقُرْبٰی حَقَّهٗ وَالْمِسْكِیْنَ وَابْنَ السَّبِیْلِ وَلَا تُبَذِّرْ تَبْذِیْرًا ۟
२६. आणि नातेवाईकांचा, आणि दीन-दुबळ्यांचा आणि प्रवाशांचा हक्क अदा करीत राहा, आणि अपव्यय करण्यापासून दूर राहा.
ዓረብኛ ተፍሲሮች:
اِنَّ الْمُبَذِّرِیْنَ كَانُوْۤا اِخْوَانَ الشَّیٰطِیْنِ ؕ— وَكَانَ الشَّیْطٰنُ لِرَبِّهٖ كَفُوْرًا ۟
२७. निश्चितच, अपव्यय (उधळपट्टी) करणारे सैतानाचे बांधव आहेत, आणि सैतान आपल्या पालनकर्त्याशी मोठा कृतघ्न आहे.
ዓረብኛ ተፍሲሮች:
 
የመልዕክት ትርጉም ሱራ (ምዕራፍ): አል ኢስራዕ
የሱራዎች ማውጫ ገፅ ቁጥር
 
የተከበረው ቁርአን መልዕክተ ትርጉም - የማራትኛ ትርጉም - ሙሐመድ ሸፊዕ አንሷሪይ - የትርጉሞች ማውጫ

በሙሐመድ ሸፊዕ አንሷሪ ተተረጎመ

ለመዝጋት