Check out the new design

Bản dịch ý nghĩa nội dung Qur'an - Người dịch tiếng Marathi - Muhammad Shafi'y Ansari * - Mục lục các bản dịch


Ý nghĩa nội dung Chương: Al-Ma-'arij   Câu:
یُّبَصَّرُوْنَهُمْ ؕ— یَوَدُّ الْمُجْرِمُ لَوْ یَفْتَدِیْ مِنْ عَذَابِ یَوْمِىِٕذٍ بِبَنِیْهِ ۟ۙ
११. (जरी ते) एकमेकांना दाखविले जातील. अपराधी, त्या दिवसाच्या शिक्षा - यातनेच्या मोबदल्यात (दंड म्हणून) आपल्या पुत्रांना देऊ इच्छिल.
Các Tafsir tiếng Ả-rập:
وَصَاحِبَتِهٖ وَاَخِیْهِ ۟ۙ
१२. आपल्या पत्नीला आणि आपल्या भावाला.
Các Tafsir tiếng Ả-rập:
وَفَصِیْلَتِهِ الَّتِیْ تُـْٔوِیْهِ ۟ۙ
१३. आणि आपल्या कुटुंबाला, जे त्याला आश्रय देत होते.
(१) अर्थात पूर्णतः ईमान राखणारे एकेश्वरवादी त्यांच्यात वर सांगितलेले वैगुण्य नसते. किंबहुना याच्या उलट ते सद्‌गुणांनी युक्त असतात. रोज नित्यनेमाने नमाज पढण्याचा अर्थ असा की ते नमाजबाबतच सुस्ती दिरंगाई करीत नाही. ते प्रत्येक नमाज तिच्या ठरलेल्या वेळेवर अगदी वक्तशीरपणे अदा करतात. कोणतेही काम त्यांना नमाजपासून रोखत नाही आणि जगाचा कोणताही लाभ त्यांना नमाज पढण्यापासून विमुख (गाफील) करीत नाही.
Các Tafsir tiếng Ả-rập:
وَمَنْ فِی الْاَرْضِ جَمِیْعًا ۙ— ثُمَّ یُنْجِیْهِ ۟ۙ
१४. आणि जमिनीवरील समस्त लोकांना, यासाठी की यांनी त्याला मुक्ती मिळवून द्यावी.
Các Tafsir tiếng Ả-rập:
كَلَّا ؕ— اِنَّهَا لَظٰی ۟ۙ
१५. (परंतु) हे कदापि होणार नाही. निःसशय, तो (धगधगणाऱ्या) निखाऱ्यांची (आग) आहे.
Các Tafsir tiếng Ả-rập:
نَزَّاعَةً لِّلشَّوٰی ۟ۚۖ
१६. जी (तोंडाची व डोक्याची) त्वचा सोलून काढणारी आहे.
Các Tafsir tiếng Ả-rập:
تَدْعُوْا مَنْ اَدْبَرَ وَتَوَلّٰی ۟ۙ
१७. ती अशा त्या प्रत्येक माणसाला हाक मारील, जो मागे हटतो आणि विमुख होतो.
Các Tafsir tiếng Ả-rập:
وَجَمَعَ فَاَوْعٰی ۟
१८. आणि गोळा (जमा) करून सांभाळून ठेवतो.
Các Tafsir tiếng Ả-rập:
اِنَّ الْاِنْسَانَ خُلِقَ هَلُوْعًا ۟ۙ
१९. निःसंशय, मनुष्य मोठ्या कच्च्या हृदयाचा बनविला गेला आहे.
Các Tafsir tiếng Ả-rập:
اِذَا مَسَّهُ الشَّرُّ جَزُوْعًا ۟ۙ
२०. जेव्हा त्याला कष्ट - यातना पोहचते, तेव्हा भयचिंतीत होतो.
Các Tafsir tiếng Ả-rập:
وَّاِذَا مَسَّهُ الْخَیْرُ مَنُوْعًا ۟ۙ
२१. आणि जेव्हा त्याला सुख प्राप्त होते, कंजूसपणा करू लागतो.
Các Tafsir tiếng Ả-rập:
اِلَّا الْمُصَلِّیْنَ ۟ۙ
२२. परंतु ते नमाज पढणारे.
Các Tafsir tiếng Ả-rập:
الَّذِیْنَ هُمْ عَلٰی صَلَاتِهِمْ دَآىِٕمُوْنَ ۟
२३. जे आपल्या नमाजचे वक्तशीर पालन करणारे आहेत.१
Các Tafsir tiếng Ả-rập:
وَالَّذِیْنَ فِیْۤ اَمْوَالِهِمْ حَقٌّ مَّعْلُوْمٌ ۟
२४. आणि ज्यांच्या धन-संपत्तीत निर्धारित हिस्सा आहे.
Các Tafsir tiếng Ả-rập:
لِّلسَّآىِٕلِ وَالْمَحْرُوْمِ ۟
२५. याचकांचाही आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचाही.
Các Tafsir tiếng Ả-rập:
وَالَّذِیْنَ یُصَدِّقُوْنَ بِیَوْمِ الدِّیْنِ ۟
२६. आणि जे न्यायाच्या दिवसावर विश्वास राखतात.
Các Tafsir tiếng Ả-rập:
وَالَّذِیْنَ هُمْ مِّنْ عَذَابِ رَبِّهِمْ مُّشْفِقُوْنَ ۟ۚ
२७. आणि जे आपल्या पालनकर्त्याच्या शिक्षेचे भय बाळगत राहतात.
Các Tafsir tiếng Ả-rập:
اِنَّ عَذَابَ رَبِّهِمْ غَیْرُ مَاْمُوْنٍ ۪۟
२८. निःसंशय, त्यांच्या पालनकर्त्याची शिक्षा यातना, निर्धास्त होण्याची बाब नाही.
Các Tafsir tiếng Ả-rập:
وَالَّذِیْنَ هُمْ لِفُرُوْجِهِمْ حٰفِظُوْنَ ۟ۙ
२९. आणि जे लोक आपल्या लज्जास्थानां (गुप्तांगां) चे (हराम कृत्यापासून) रक्षण करतात.
Các Tafsir tiếng Ả-rập:
اِلَّا عَلٰۤی اَزْوَاجِهِمْ اَوْ مَا مَلَكَتْ اَیْمَانُهُمْ فَاِنَّهُمْ غَیْرُ مَلُوْمِیْنَ ۟ۚ
३०. पंरतु आपल्या पत्नींच्या आणि आपल्या दासींच्याखेरीज ज्यांचे ते मालक (स्वामी) आहेत, या बाबतीत ते निंदनीय नाहीत.
Các Tafsir tiếng Ả-rập:
فَمَنِ ابْتَغٰی وَرَآءَ ذٰلِكَ فَاُولٰٓىِٕكَ هُمُ الْعٰدُوْنَ ۟ۚ
३१. आता जो कोणी याच्याखेरीज (मार्ग) शोधेल, तर असे लोक मर्यादेचे उल्लंघन करणारे ठरतील.
Các Tafsir tiếng Ả-rập:
وَالَّذِیْنَ هُمْ لِاَمٰنٰتِهِمْ وَعَهْدِهِمْ رٰعُوْنَ ۟
३२. आणि जे आपल्या अनामती (ठेवी) ची, आणि आपल्या वायद्या-वचनांची व प्रतिज्ञेची कास बाळगतात.
Các Tafsir tiếng Ả-rập:
وَالَّذِیْنَ هُمْ بِشَهٰدٰتِهِمْ قَآىِٕمُوْنَ ۟
३३. आणि जे आपल्या साक्षींवर सरळ (आणि अटळ) राहतात.
Các Tafsir tiếng Ả-rập:
وَالَّذِیْنَ هُمْ عَلٰی صَلَاتِهِمْ یُحَافِظُوْنَ ۟ؕ
३४. आणि जे आपल्या नमाजांचे संरक्षण करतात.
Các Tafsir tiếng Ả-rập:
اُولٰٓىِٕكَ فِیْ جَنّٰتٍ مُّكْرَمُوْنَ ۟ؕ۠
३५. हेच लोक जन्नतमध्ये मान - प्रतिष्ठा राखणारे असतील.
Các Tafsir tiếng Ả-rập:
فَمَالِ الَّذِیْنَ كَفَرُوْا قِبَلَكَ مُهْطِعِیْنَ ۟ۙ
३६. तेव्हा, या काफिरांना झाले तरी काय की ते तुमच्याकडे धावत येतात.
Các Tafsir tiếng Ả-rập:
عَنِ الْیَمِیْنِ وَعَنِ الشِّمَالِ عِزِیْنَ ۟
३७. उजव्या आणि डाव्या बाजूने, समूहासमूहाने.
Các Tafsir tiếng Ả-rập:
اَیَطْمَعُ كُلُّ امْرِئٍ مِّنْهُمْ اَنْ یُّدْخَلَ جَنَّةَ نَعِیْمٍ ۟ۙ
३८. काय त्यांच्यापैकी प्रत्येकजण असे इच्छितो की त्यांना देणग्यांनी युक्त (ऐश-आरामाच्या) जन्नतमध्ये प्रवेश लाभेल?
Các Tafsir tiếng Ả-rập:
كَلَّا ؕ— اِنَّا خَلَقْنٰهُمْ مِّمَّا یَعْلَمُوْنَ ۟
३९. (असे) कदापि होणार नाही. आम्ही त्यांना त्या (वस्तू) पासून निर्माण केले आहे, जिला ते जाणतात.
Các Tafsir tiếng Ả-rập:
فَلَاۤ اُقْسِمُ بِرَبِّ الْمَشٰرِقِ وَالْمَغٰرِبِ اِنَّا لَقٰدِرُوْنَ ۟ۙ
४०. तेव्हा मला शपथ आहे दोन्ही पूर्व आणि पश्चिम (दिशां) च्या पालनकर्त्याची की आम्ही निश्चतपणे समर्थ आहोत.
Các Tafsir tiếng Ả-rập:
 
Ý nghĩa nội dung Chương: Al-Ma-'arij
Mục lục các chương Kinh Số trang
 
Bản dịch ý nghĩa nội dung Qur'an - Người dịch tiếng Marathi - Muhammad Shafi'y Ansari - Mục lục các bản dịch

Người dịch Muhammad Shafi'y Ansari.

Đóng lại