Check out the new design

แปล​ความหมาย​อัลกุรอาน​ - คำแปลภาษามราฐี - มุฮัมมัด ชะฟีอ์ อันศอรีย์ * - สารบัญ​คำแปล


แปลความหมาย​ สูเราะฮ์: Muhammad   อายะฮ์:
وَیَقُوْلُ الَّذِیْنَ اٰمَنُوْا لَوْلَا نُزِّلَتْ سُوْرَةٌ ۚ— فَاِذَاۤ اُنْزِلَتْ سُوْرَةٌ مُّحْكَمَةٌ وَّذُكِرَ فِیْهَا الْقِتَالُ ۙ— رَاَیْتَ الَّذِیْنَ فِیْ قُلُوْبِهِمْ مَّرَضٌ یَّنْظُرُوْنَ اِلَیْكَ نَظَرَ الْمَغْشِیِّ عَلَیْهِ مِنَ الْمَوْتِ ؕ— فَاَوْلٰى لَهُمْ ۟ۚ
२०. आणि ज्यांनी ईमान राखले ते म्हणतात की एखादी सूरह (अध्याय) का नाही अवतरित केली गेली, मग जेव्हा एखादी स्पष्ट अर्थाची सूरह अवतरित केली जाते आणि तिच्यात जिहादचा उल्लेख केला जातो, तेव्हा तुम्ही पाहता की ज्यांच्या मनात रोग आहे, ते तुमच्याकडे अशा प्रकारे पाहतात जसे तो मनुष्य पाहतो, जो मृत्युने मूर्छित झाला असेल. तेव्हा फार चांगले होते त्यांच्याकरिता.
ตัฟสีรต่างๆ​ ภาษาอาหรับ:
طَاعَةٌ وَّقَوْلٌ مَّعْرُوْفٌ ۫— فَاِذَا عَزَمَ الْاَمْرُ ۫— فَلَوْ صَدَقُوا اللّٰهَ لَكَانَ خَیْرًا لَّهُمْ ۟ۚ
२१. आज्ञापालन करणे आणि भल्या चांगल्या गोष्टी बोलणे मग जेव्हा कार्य निर्धारित होईल, तेव्हा जर ते अल्लाहशी सचोटीने राहतील तर त्यांच्यासाठी भलाई आहे.
ตัฟสีรต่างๆ​ ภาษาอาหรับ:
فَهَلْ عَسَیْتُمْ اِنْ تَوَلَّیْتُمْ اَنْ تُفْسِدُوْا فِی الْاَرْضِ وَتُقَطِّعُوْۤا اَرْحَامَكُمْ ۟
२२. आणि तुमच्याकडून तेही दूर (असंभव) नाही की जर तुम्हाला राज्य लाभेल, तर तुम्ही धरतीवर उत्पात (फसाद) निर्माण कराल आणि नाते संबंध तोडाल.
ตัฟสีรต่างๆ​ ภาษาอาหรับ:
اُولٰٓىِٕكَ الَّذِیْنَ لَعَنَهُمُ اللّٰهُ فَاَصَمَّهُمْ وَاَعْمٰۤی اَبْصَارَهُمْ ۟
२३. हेच ते लोक होत, ज्यांचा अल्लाहने धिःक्कार केला आहे आणि (अल्लाहने) ज्यांची श्रवण शक्ती आणि डोळ्यांचा प्रकाश हिरावून घेतला आहे.
ตัฟสีรต่างๆ​ ภาษาอาหรับ:
اَفَلَا یَتَدَبَّرُوْنَ الْقُرْاٰنَ اَمْ عَلٰی قُلُوْبٍ اَقْفَالُهَا ۟
२४. काय हे लोक कुरआनावर विचार चिंतन नाही करीत किंवा त्यांच्या हृदयांवर कुलुपे लावली गेली आहेत?
ตัฟสีรต่างๆ​ ภาษาอาหรับ:
اِنَّ الَّذِیْنَ ارْتَدُّوْا عَلٰۤی اَدْبَارِهِمْ مِّنْ بَعْدِ مَا تَبَیَّنَ لَهُمُ الْهُدَی ۙ— الشَّیْطٰنُ سَوَّلَ لَهُمْ ؕ— وَاَمْلٰی لَهُمْ ۟
२५. ज्या लोकांनी मार्गदर्शन स्पष्ट झाल्यानंतरही आपली पाठ फिरवली तर निःसंशय, सैतानाने त्यांच्याकरिता (त्यांच्या कर्मांना) सुशोभित केले आहे आणि त्यांना ढील (सवड) देऊन ठेवली आहे.
ตัฟสีรต่างๆ​ ภาษาอาหรับ:
ذٰلِكَ بِاَنَّهُمْ قَالُوْا لِلَّذِیْنَ كَرِهُوْا مَا نَزَّلَ اللّٰهُ سَنُطِیْعُكُمْ فِیْ بَعْضِ الْاَمْرِ ۚ— وَاللّٰهُ یَعْلَمُ اِسْرَارَهُمْ ۟
२६. हे अशासाठी की, त्यांनी त्या लोकांना, ज्यांनी अल्लाहने अवतरित केलेल्या (वहयी)ला नापसंत केले, हे सांगितले की आम्हीही निकट भविष्यात काही कामांमध्ये तुमचे म्हणणे मान्य करून आणि अल्लाह त्यांच्या रहस्यभेदांना चांगल्या प्रकारे जाणतो.
ตัฟสีรต่างๆ​ ภาษาอาหรับ:
فَكَیْفَ اِذَا تَوَفَّتْهُمُ الْمَلٰٓىِٕكَةُ یَضْرِبُوْنَ وُجُوْهَهُمْ وَاَدْبَارَهُمْ ۟
२७. तेव्हा त्यांची कशी दुरावस्था होईल, जेव्हा फरिश्ते त्यांचे प्राण काढताना त्यांच्या तोंडावर आणि कंबरेवर मारतील.
ตัฟสีรต่างๆ​ ภาษาอาหรับ:
ذٰلِكَ بِاَنَّهُمُ اتَّبَعُوْا مَاۤ اَسْخَطَ اللّٰهَ وَكَرِهُوْا رِضْوَانَهٗ فَاَحْبَطَ اَعْمَالَهُمْ ۟۠
२८. हे या कारणास्तव की यांनी त्या मार्गाचे अनुसरण केले, ज्यामुळे (त्यांनी) अल्लाहला नाराज केले आणि त्यांनी त्याच्या प्रसन्नतेला वाईट जाणले, तेव्हा अल्लाहने त्यांच्या कर्मांना निष्फळ केले.
ตัฟสีรต่างๆ​ ภาษาอาหรับ:
اَمْ حَسِبَ الَّذِیْنَ فِیْ قُلُوْبِهِمْ مَّرَضٌ اَنْ لَّنْ یُّخْرِجَ اللّٰهُ اَضْغَانَهُمْ ۟
२९. काय त्या लोकांनी, ज्यांच्या मनात रोग (विकृती) आहे, असे समजून घेतले आहे की अल्लाह त्यांचे कपट जाहीर करणारच नाही.
ตัฟสีรต่างๆ​ ภาษาอาหรับ:
 
แปลความหมาย​ สูเราะฮ์: Muhammad
สารบัญสูเราะฮ์ หมายเลข​หน้า​
 
แปล​ความหมาย​อัลกุรอาน​ - คำแปลภาษามราฐี - มุฮัมมัด ชะฟีอ์ อันศอรีย์ - สารบัญ​คำแปล

แปลโดย มูฮัมมัด ชะฟีอ์ อันศอรีย์

ปิด