Check out the new design

വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ * - വിവർത്തനങ്ങളുടെ സൂചിക


പരിഭാഷ അദ്ധ്യായം: ത്തൗബഃ   ആയത്ത്:
كَیْفَ یَكُوْنُ لِلْمُشْرِكِیْنَ عَهْدٌ عِنْدَ اللّٰهِ وَعِنْدَ رَسُوْلِهٖۤ اِلَّا الَّذِیْنَ عٰهَدْتُّمْ عِنْدَ الْمَسْجِدِ الْحَرَامِ ۚ— فَمَا اسْتَقَامُوْا لَكُمْ فَاسْتَقِیْمُوْا لَهُمْ ؕ— اِنَّ اللّٰهَ یُحِبُّ الْمُتَّقِیْنَ ۟
७. अनेकेश्वरवाद्यांचा वायदा अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी कसा काय राहू शकतो, त्यांच्याखेरीज, ज्यांच्याशी तुम्ही मसजिदे हरामजवळ वचन करार केला आहे, तर जोपर्यंत ते लोक तुमच्याशी करार-पालन करतील, तुम्हीही त्यांच्याशी केलेल्या वायद्यावर कायम राहा. सर्वश्रेष्ठ अल्लाह, भय राखून वागणाऱ्या लोकांशी प्रेम राखतो.
അറബി തഫ്സീറുകൾ:
كَیْفَ وَاِنْ یَّظْهَرُوْا عَلَیْكُمْ لَا یَرْقُبُوْا فِیْكُمْ اِلًّا وَّلَا ذِمَّةً ؕ— یُرْضُوْنَكُمْ بِاَفْوَاهِهِمْ وَتَاْبٰی قُلُوْبُهُمْ ۚ— وَاَكْثَرُهُمْ فٰسِقُوْنَ ۟ۚ
८. त्यांच्या वचन-वायद्यांचा काय भरोसा? त्यांना जर तुमच्यावर वर्चस्व लाभले तर ते ना नातेसंबंधाचा विचार करतील, ना वचन-कराराचा. आपल्या मुखाने हे तुम्हाला रिझवित आहेत, परंतु यांची मने मानत नाहीत आणि त्यांच्यात अधिकांश लोक फासिक (दुराचारी) आहेत.
അറബി തഫ്സീറുകൾ:
اِشْتَرَوْا بِاٰیٰتِ اللّٰهِ ثَمَنًا قَلِیْلًا فَصَدُّوْا عَنْ سَبِیْلِهٖ ؕ— اِنَّهُمْ سَآءَ مَا كَانُوْا یَعْمَلُوْنَ ۟
९. त्यांनी अल्लाहच्या आयतींना फार कमी किमतीत विकले, आणि त्याच्या मार्गापासून रोखले. मोठे वाईट आहे, जे हे करीत आहेत.
അറബി തഫ്സീറുകൾ:
لَا یَرْقُبُوْنَ فِیْ مُؤْمِنٍ اِلًّا وَّلَا ذِمَّةً ؕ— وَاُولٰٓىِٕكَ هُمُ الْمُعْتَدُوْنَ ۟
१०. हे तर एखाद्या ईमानधारकाच्या हक्कात कसल्याही नात्याची किंवा वचनाची काळजी करीत नाही. हे आहेतच हद्द ओलांडून जाणारे.
അറബി തഫ്സീറുകൾ:
فَاِنْ تَابُوْا وَاَقَامُوا الصَّلٰوةَ وَاٰتَوُا الزَّكٰوةَ فَاِخْوَانُكُمْ فِی الدِّیْنِ ؕ— وَنُفَصِّلُ الْاٰیٰتِ لِقَوْمٍ یَّعْلَمُوْنَ ۟
११. अजूनही जर ते तौबा (पश्चात्तापयुक्त क्षमा याचना) करतील आणि नमाज नियमितपणे पढू लागतील आणि जकात देत राहतील तर तुमचे धर्म-बांधव आहेत आणि आम्ही तर समंजस लोकांसाठी आपल्या आयतींचे तपशीलपूर्वक निवेदन करीत आहोत.
അറബി തഫ്സീറുകൾ:
وَاِنْ نَّكَثُوْۤا اَیْمَانَهُمْ مِّنْ بَعْدِ عَهْدِهِمْ وَطَعَنُوْا فِیْ دِیْنِكُمْ فَقَاتِلُوْۤا اَىِٕمَّةَ الْكُفْرِ ۙ— اِنَّهُمْ لَاۤ اَیْمَانَ لَهُمْ لَعَلَّهُمْ یَنْتَهُوْنَ ۟
१२. जर हे लोक वचन-वायद्यानंतरही आपल्या वचनाचा भंग करतील आणि तुमच्या धर्माची निंदा-नालस्तीही करतील तर तुम्हीही अशा काफिरांच्या सरदारांशी भिडा. त्यांची शपथ काहीच नाही. संभवतः अशा प्रकारे ते (असे करणे) थांबवतील.
അറബി തഫ്സീറുകൾ:
اَلَا تُقَاتِلُوْنَ قَوْمًا نَّكَثُوْۤا اَیْمَانَهُمْ وَهَمُّوْا بِاِخْرَاجِ الرَّسُوْلِ وَهُمْ بَدَءُوْكُمْ اَوَّلَ مَرَّةٍ ؕ— اَتَخْشَوْنَهُمْ ۚ— فَاللّٰهُ اَحَقُّ اَنْ تَخْشَوْهُ اِنْ كُنْتُمْ مُّؤْمِنِیْنَ ۟
१३. तुम्ही त्या लोकांची डोकी ठेचण्यासाठी का तयार होत नाही, ज्यांनी आपल्या शपथा तोडून टाकल्या आणि (अंतिम) पैगंबराला देशाबाहेर घालविण्याच्या विचारात आहे, आणि स्वतःच पहिल्यांदा त्यांनी तुमची छेड काढली आहे. काय तुम्ही त्यांना भिता? वस्तुतः अल्लाहलाच सर्वांत जास्त हक्क आहे की तुम्ही त्याचे भय राखावे, जर तुम्ही ईमानधारक असाल.
അറബി തഫ്സീറുകൾ:
 
പരിഭാഷ അദ്ധ്യായം: ത്തൗബഃ
സൂറത്തുകളുടെ സൂചിക പേജ് നമ്പർ
 
വിശുദ്ധ ഖുർആൻ പരിഭാഷ - മറാതീ വിവർത്തനം - മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസ്വാരീ - വിവർത്തനങ്ങളുടെ സൂചിക

അത് വിവർത്തനം ചെയ്തത് മുഹമ്മദ് ശഫീഅ് അൻസാരി.

അവസാനിപ്പിക്കുക