للإطلاع على الموقع بحلته الجديدة

ترجمة معاني القرآن الكريم - الترجمة الماراتية - محمد شفيع أنصاري * - فهرس التراجم


ترجمة معاني سورة: الإسراء   آية:
وَاِمَّا تُعْرِضَنَّ عَنْهُمُ ابْتِغَآءَ رَحْمَةٍ مِّنْ رَّبِّكَ تَرْجُوْهَا فَقُلْ لَّهُمْ قَوْلًا مَّیْسُوْرًا ۟
२८. आणि आपल्या पालनकर्त्याच्या त्या दया-कृपेचा शोध घेण्यात, जिची तू आशा बाळगतो, जर तुला त्यांच्यापासून तोंड फिरवावे लागेल तर अशाही स्थितीत तू त्यांना चांगल्या प्रकारे आणि नरमीने समजाविले पाहिजे.
التفاسير العربية:
وَلَا تَجْعَلْ یَدَكَ مَغْلُوْلَةً اِلٰی عُنُقِكَ وَلَا تَبْسُطْهَا كُلَّ الْبَسْطِ فَتَقْعُدَ مَلُوْمًا مَّحْسُوْرًا ۟
२९. आणि आपला हात आपल्या गळ्याशी बांधून ठेवू नका आणि ना तो पूर्णपणे मोकळा सोडा, मग धिःक्कारलेला आणि पश्चात्तापित होऊन बसावे.
التفاسير العربية:
اِنَّ رَبَّكَ یَبْسُطُ الرِّزْقَ لِمَنْ یَّشَآءُ وَیَقْدِرُ ؕ— اِنَّهٗ كَانَ بِعِبَادِهٖ خَبِیْرًا بَصِیْرًا ۟۠
३०. निःसंशय, तुमचा पालनकर्ता, ज्याला इच्छितो रोजी (आजिविका) विस्तृत करतो आणि ज्याच्यासाठी इच्छितो संकुचित (तंग) करतो. निःसंशय, तो आपल्या दासांची पुरेपूर खबर राखतो आणि खूप चांगल्या प्रकारे पाहणारा आहे.
التفاسير العربية:
وَلَا تَقْتُلُوْۤا اَوْلَادَكُمْ خَشْیَةَ اِمْلَاقٍ ؕ— نَحْنُ نَرْزُقُهُمْ وَاِیَّاكُمْ ؕ— اِنَّ قَتْلَهُمْ كَانَ خِطْاً كَبِیْرًا ۟
३१. आणि दारिद्य्राच्या भयाने आपल्या संततीला मारून टाकू नका. त्यांना आणि तुम्हाला आम्हीच रोजी (आजिविका) प्रदान करतो. निःसंशय, त्यांची हत्या करणे फार मोठा अपराध आहे.
التفاسير العربية:
وَلَا تَقْرَبُوا الزِّنٰۤی اِنَّهٗ كَانَ فَاحِشَةً ؕ— وَسَآءَ سَبِیْلًا ۟
३२. आणि खबरदार! व्यभिचाराच्या जवळही जाऊ नका, कारण ती मोठी निर्लज्जता आहे, आणि अतिशय वाईट मार्ग आहे.
التفاسير العربية:
وَلَا تَقْتُلُوا النَّفْسَ الَّتِیْ حَرَّمَ اللّٰهُ اِلَّا بِالْحَقِّ ؕ— وَمَنْ قُتِلَ مَظْلُوْمًا فَقَدْ جَعَلْنَا لِوَلِیِّهٖ سُلْطٰنًا فَلَا یُسْرِفْ فِّی الْقَتْلِ ؕ— اِنَّهٗ كَانَ مَنْصُوْرًا ۟
३३. आणि एखाद्या जीवाला, ज्याला मारणे अल्लाहने हराम केले आहे, कधीही अवैधरित्या मारू नका (त्याची हत्या करू नका) आणि जो मनुष्य निरपराध अवस्थेत ठार मारला जाईल तर आम्ही त्याच्या वारसाला हक्क देऊन ठेवला आहे. परंतु त्याने (प्रतिशोध म्हणून) ठार मारण्यात घाई करू नये. निःसंशय त्याची मदत केली गेली आहे.
التفاسير العربية:
وَلَا تَقْرَبُوْا مَالَ الْیَتِیْمِ اِلَّا بِالَّتِیْ هِیَ اَحْسَنُ حَتّٰی یَبْلُغَ اَشُدَّهٗ ۪— وَاَوْفُوْا بِالْعَهْدِ ۚ— اِنَّ الْعَهْدَ كَانَ مَسْـُٔوْلًا ۟
३४. आणि अनाथाच्या धन-संपत्तीच्या जवळही जाऊ नका, त्या पद्धतीशिवाय, जी अधिक चांगली असे, येथपर्यंत की ते आपल्या सज्ञान होण्याच्या वयास पोहचावेत आणि वायदा पूर्ण करीत जा कारण की वायद्याविषयी विचारणा होईल.
التفاسير العربية:
وَاَوْفُوا الْكَیْلَ اِذَا كِلْتُمْ وَزِنُوْا بِالْقِسْطَاسِ الْمُسْتَقِیْمِ ؕ— ذٰلِكَ خَیْرٌ وَّاَحْسَنُ تَاْوِیْلًا ۟
३५. आणि जेव्हा मापून द्याल तेव्हा पूर्ण माप भरून द्या आणि सरळ तराजूने तोलून द्या. हेच चांगले आहे आणि याचा परिणामही फार चांगला आहे.
التفاسير العربية:
وَلَا تَقْفُ مَا لَیْسَ لَكَ بِهٖ عِلْمٌ ؕ— اِنَّ السَّمْعَ وَالْبَصَرَ وَالْفُؤَادَ كُلُّ اُولٰٓىِٕكَ كَانَ عَنْهُ مَسْـُٔوْلًا ۟
३६. आणि ज्या गोष्टीची तुम्हाला खबरही नसेल, अशा गोष्टीच्या मागे लागू नका, कारण कान आणि डोळे आणि हृदय यांच्यापैकी प्रत्येकाला विचारणा केली जाणार आहे.
التفاسير العربية:
وَلَا تَمْشِ فِی الْاَرْضِ مَرَحًا ۚ— اِنَّكَ لَنْ تَخْرِقَ الْاَرْضَ وَلَنْ تَبْلُغَ الْجِبَالَ طُوْلًا ۟
३७. आणि जमिनीवर मोठ्या दिमाखाने व गर्वाने चालू नका, कारण (अशाने) ना तुम्ही जमिनीला फाडू शकता आणि ना पर्वतांच्या उंचीपर्यंत पोहोचू शकता.
التفاسير العربية:
كُلُّ ذٰلِكَ كَانَ سَیِّئُهٗ عِنْدَ رَبِّكَ مَكْرُوْهًا ۟
३८. या सर्व कामांचा वाईटपणा तुमच्या पालनकर्त्याजवळ अतिशय अप्रिय आहे.
التفاسير العربية:
 
ترجمة معاني سورة: الإسراء
فهرس السور رقم الصفحة
 
ترجمة معاني القرآن الكريم - الترجمة الماراتية - محمد شفيع أنصاري - فهرس التراجم

ترجمها محمد شفيع أنصاري.

إغلاق